क्रिडार्इ कोल्हापूरची मासिक सभा दि 25 सप्टेंबर 2024 रोजी हॉटेल रेसिडेन्सी कल्ब,कोल्हापूर येथे पार पडली.या मिटींगला सदर महिन्यातील पार पडलेल्या मिटींग,कार्यक्रम यांचा आढावा घेऊन आजच्या मिटींग मध्ये क्रिडार्इ महाराष्ट्राच्या रेरा कमिटीचे को कनव्हेनर क्रिडार्इ कोल्हापूरचे संचालक आदित्य बेडेकर यांचे Updates about MahaRERA & introduction of Mahacriti. या विषया वरती प्रझेंटेशन सादर करतेवेळी रेरा प्रकल्प नोंदणी करण्यापासुन ते फॉर्म (सबमिट) करण्यापर्यंतची सर्व माहिती कशी भरली जाते, याचे प्प्ट स्वरूपात सादरीकरण केले.रेरा कायदा मध्ये सुधारणा होऊन, वेळो वेळी बदल होत असतात.सध्या प्र्रकल्पाची माहिती अपलोडकरणे,फर्म,पार्टनर माहिती बॅक खाती, कर्ज, खर्च याच्यां नोंदी कशा ठेवाव्यात.आता संपुर्ण प्रोजेक्टची माहिती ही एका QR कोड च्या माध्यमातुन अपलोड करणे प्रत्येकाला बंधनकारक केले आहे.प्रकल्पामध्ये ज्या सुविधा देत आहोत त्याचे तंतोतंत पालन करणे,प्रकल्प वेळेत सुरू करून तो वेळेत ताब्यात देणे, ज्या एजन्सीज कडुन काम करून घेणार आहोत त्यांचे नोंदणी आहे काय? या व अशा विविध मुदयांवरती सविस्तर प्रझंटेशन दोन भागात सादर करून सभासदांच्या मनातील प्रश्नांना समर्पक उत्तरे दिलीत.या बदल अध्यक्ष के.पी.खोत यांनी आदित्य बेडेकर यांचे अभिनंदन केले. आमचे सह खजानिस सचिन परांजपे यांना दि इन्टिटयूशन ऑफ इंजिनिअर्स संस्थेच्या वतीने बेस्ट इंजिनिअर पुरस्कार मिळाल्याबदल त्यांचे क्रिडार्इ कोल्हापूर तर्फे अभिनंदन करून अध्यक्ष के.पी.खोत यांच्या हस्ते शाल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कारा प्रसंगी सचिन परांजपे नी आपले मनोगत व्यक्तत करताना या वर्षी 15 सप्टेंबर इंजिनियर डे दिवशी मला बेस्ट इंजिनिअर पुरस्कार देण्यात आला.या वेळी 25 बायोडाटा आले होते त्यामध्ये विविध वर्गवारी करण्यात आली होती. बेस्ट इंजिनिअर मध्ये आज पर्यत केलेल्या बांधकाम कामाचा आढावा आणी सामाजिक कार्य (Social Counterbuatation) याच्या बळावरती हा पुरस्कार मिळाला असे सांगीतले व क्रिडार्इ कोल्हापूरचा मी सभासद असल्याचा मला अभिमान असुन क्रिडार्इने केलेल्या यथोचित सत्कारा बदल ही आभार मानले.त्यानंतर आमचे सभासद धवल पुसाळकर यांची पुतणी कु.समिधा पुसाळकर यांनी इटली मध्ये आर्किटेक्चर मधील Conservation policies of religious heritage या विषयात पी.एच.डी.केली.या वेळी क्रिडार्इ कोल्हापूर अध्यक्ष के.पी.खोत यांच्या हस्ते तिचा शाल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कु.समिधा पुसाळकर यांनी आपण हेच क्षेत्र का निवडले आपली निवड कशी झाली या विषयी माहिती दिली.क्रिडार्इने केलेल्या सत्काराबदल तिने क्रिडार्इचे आभार मानले. दि.5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनी भारताच्या महामहीम राष्ट्रपती मा.द्र्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री सागर बगाडेसर आणी श्री.विवेक चंदालिया सर यांचे क्रिडार्इ कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी. खोत व सचिव संदिप मिरजकर यांच्या हस्ते शाल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या सत्कारावेळी श्री सागर बगाडेसर यांनी आपले आजवरचा शैक्षणीक प्रवास कसा झाला व आपल्या हातुन अनेक चांगले विद्यार्थी कसे घडले,आपले पुढील व्हिजन काय आहे हे सांगीतले त्यानंतर श्री.विवेक चंदालिया सर यांनी आपण आजवर जे शैक्षणीक योगदान दिले याची सविस्तर महिती देताना माझे विद्यार्थी आज देश परदेशात विविध कंपनी मध्ये मोठया पदावरती आहेत.मी आय.टी आय.च्या माध्यमातून विद्यार्थयांना रोजगारभिमुख शिक्षण देण्यास प्राधान्य दिले.याच कौशल्याच्या बळावर आज आपणाला आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याचे सांगतिले.क्रिडार्इ कोल्हापूरने आमचा यशोचित सत्कार केल्याबदल आभार मानले.क्रिडार्इ अध्यक्ष के.पी.खोत यांनी आपणास आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल हा पुरस्कार मिळालेमुळे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.आपणास भावी वाटचालीस शुभेच्छा व यापुढेही असेच यश लाभो ही सदिच्छा अशा शब्दात आभार मानले.