दि.28 ऑगस्ट 2024 रोजी क्रिडार्इ कोल्हापूरची मासीक सभा सयाजी हॉटेल कोल्हापूर येथे पार पडली.आजच्या सभेला दिपप्रज्वलाने सुरूवात झाली.या नंतर अध्यक्ष के.पी.खोत यांनी सीए.विनित देव सरांचा स्टेजवर स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून व्याख्यानास सुरूवात झाली.संचालक आदित्य बेडेकर यांनी देव साहेबांचा बायोडाटा वाचुन दाखविला C A Vinit Deo Mananing director Posivew Group यांचे विकसीत भारत का विकसीत डेव्हलपर्स Exploring opportunities beyond traditional real estate या विषयी सुंदर पीपीटी प्रझंटेशन सादर केले.या मध्ये त्यांनी एकत्रीत संस्थात्मक प्रयत्न करून नवीन प्रकल्पासाठी कसा व किती पैसा कर्ज स्वरूपात उपल्बध करावा यांचे मार्गदर्शन केले.व्यवसाय कोणताही असो तो करताना ग्राहकहित कसे जोपासुन आपला प्रोजेक्ट कसा इतरांच्या पेक्षा वेगळा आहे.ग्राहकांना कशाप्रकारे आकर्षित करावे.पांरपारीक व्यवसायापासुन ते मोठमोठया व्यवसायामध्ये टिम वर्क,मॅनेजमेंट,पुढील व्हिजन,ग्रोथ,बिझनेस स्कील कसे असावे.या विषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हातकणंगले मतदार संघातून मा.धैर्यशील माने खासदारपदी दुस-यांदा निवडून आलेबद्दल त्यांचे अभिंनदन क्रिडार्इ कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.क्रिडार्इ कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत यांनी आपल्या प्रस्तावीत भाषणात क्रिडार्इ कोल्हापूरने आज पर्यंत शहरात केलेल्या कामांचा आढावा मा.खासदार साहेबांच्या पुढे मांडून कोल्हापूर शहरातील ज्वलंत प्रश्न मांडले तसेच क्रिडार्इ कोल्हापूरच्या बांधकाम व्यावसायीकांना काम करत असतानाच्या येणाऱ्या अडचणी,अनेक प्रश्न अगदी मुद्दसुद मांडले.मा.खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाठी आपण सदैव तयार आहोत आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने विविध अडचणी मी समजावुन घेवून त्या पुढे मा.मुख्यमंत्री साहेब व त्या त्या विभागानां सांगणे आणी कोल्हापूर हातकलंगले या शहरात विविध मोठे प्रकल्प आणन्यासाठी प्रयत्न करीन त्याविषयी संसदेत कोल्हापूरचा शहराच्या विकासाठी आवाज उठवू आणी क्रिडार्इ कोल्हापूरचे सभासदांच्या विविध अडचणी आम्ही आमचे स्तरावरती सोडवू अशी ग्वाही देवून क्रिडार्इ कोल्हापूरने केलेल्या सत्कारा बद्दल आभार मानुन क्रिडार्इ कोल्हापूरला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलया.