कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी दि.27 ऑगस्ट 2024 रोजी क्रिडार्इ कोल्हापूर सभासदांच्या विविध कामासंदर्भात कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक, सहाय्यक संचालक नगररचना, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (घरफाळा) आशा सर्व अधिकारी वर्गासोबत सोबत बैठक आयोजित केली होती.या बैठकीमध्ये नगररचना विभाग,कोल्हापापूर महानगरपालिकेकडे बऱ्याच दिवसापासून प्रलंबीत असलेला घरफाळया विषयी व इतर विभागातील घ्याव्या लागणाऱ्या (NOC बाबत BPMS Softwear) व त्या मधील त्रुटी या सर्व विषयावर चर्चा होऊन घरफाळा,पाणीपुरवठा विभाग अशा विविध विभागातील येणाऱ्या अडचणी अशा विविध विषयी सविस्तर चर्चा झाली.चर्चाअंती मा.प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी क्रिडार्इ कोल्हापूरच्या सभासदांची कामे जलद गतीने करण्याच्या सुचना अधिकाऱ्यानां दिल्या.या मिटींगला मा.प्रशासक के.मंजुलक्ष्मी, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जलअभियंता हर्षजीत घाटगे,उपशहर रचनाकार रमेश मस्कर,मुख्य अग्नीशमन अधिकारी मनिष रणभिसे,करनिर्धारक संग्राहक सुधाकर चलावाड,सतिश फप्पे व महादेव फुलारी तसेच नगररचना विभागाचे अधिकारी,कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी, व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच क्रिडार्इ कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत,उपाध्यक्ष सचिन ओसवाल,सचिव संदिप मिरजकर,खजानिस अजय डोर्इजड, क्रिडार्इ महाराष्ट्रचे सचिव विघानंद बेडेकर, क्रिडार्इ कोल्हापूरचे माजी अध्यक्ष महेश यादव,कृष्णात पाटील, विलास रेडेकर,प्रकाश देवलापूरकर, सह खजानिस सचिन परांजपे,संचालक विजय माणगांवकर,लक्ष्मीकांत चौगुले,श्रीराम पाटील,विशवजीत जाधव,आदित्य बेडेकर,संदिप पोवार, व इतर सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.