इंजिनियर सर मोक्षगुंडन विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिवस अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो व तो प्रत्येक वर्षी क्रिडार्इमार्फत साजरा करण्यात येतो.यावर्षी रविवार दि.15 सप्टेंबर, 2024 रोजीचा अभियंता दिन मा.संभाजी माने साहेब मुख्य अभियंता,प्रधानमंत्री ग्राम सडक योजना,महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थिीत क्रिडार्इ कोल्हापूरच्या कार्यालयामध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी सर मोक्षगुंडन विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पुजन मा.संभाजी माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच माने साहेबाचे स्वागत व सत्कार मा.अध्यक्ष के.पी.खोत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.प्रस्तावना करतेवेळी मा सचिव संदिप मिरजकर यांनी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा आढावा घेतला.मा.संभाजी माने साहेबांची ओळख व यांच्या कारकिर्दी विषयी सविस्तर माहिती सभासद श्रीधर कुलकर्णी यांनी दिली.माने साहेबांनी आत्ता पर्यंत केलेले प्रोजेक्ट महाराष्ट्र सरकारच्या विविध योजना सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे व मोठे प्रकल्प करत असताना येणारे
अनुभव या विषयी महिती दिली तसेच त्याच प्रमाणे पंतप्रधान ग्राम सडक योजनेची कामे,कशी करतात या विषयी सविस्तर माहिती दिली.या प्रसंगी क्रिडार्इ कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत, उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदिप मिरजकर यांचे हस्ते व संचालक सहसचिव सचिन परांजपे, खजानिस अजय डोर्इजड, विश्वजीत जाधव तसेच सभासद सुजय होसमणी, श्रीधर कुलकर्णी, प्रमोद साळुंखे, हेमंत सोनार, योगेश आठले, सुधीर हंाजे, मिलिंद नार्इक, प्रतिक होसमणी, रजत सोनार व अनिकेत हेलेकर इ.सभासद उपस्थितीत होते.मा.अध्यक्ष के.पी.खोत यांनी प्रमुख पाहुण्यासह सर्व सभासदाचे आभार मानले.