क्रिडार्इ महाराष्ट्राची 4 थी साऊथ वेस्ट झोन मिटींग 23 ऑगस्ट 2024 रोजी क्रिडार्इ कागल व क्रिडार्इ गडहिंग्लज या सिटी चाप्टरनी डार्क फॉरेस्ट रिसॉर्ट, अंबोली येथे आयोजीत केली होती.या 17 सिटी चॉप्टर मधुन 115 सभासद उपस्थित होते.दोन सत्रामध्ये ही सभा पार पडली. 1)व्यवसाय व्यवस्थापन (Business Management) या विषयावरती राजीव परीख माजी अध्यक्ष क्रिडार्इ महाराष्ट्र यांनी बांधकाम व्यवसाय मोठा विस्तारणारा व्यवसाय असुन या मध्ये काम करत असताना उतकृष्ट उत्कृष्ट व्यवस्थापन कसे असावे या विषयी मार्गदर्शन केले.त्यानंतर 2) रेरा बदलासाठी तयार रहा (RERA - Be prepared for change) या विषयावरती आदित्य बेडेकर रेरा कमिटी को-कन्वेअर क्रिडार्इ महाराष्ट्र यांनी रेरा कायदामध्ये पुढे येणारे बदल कसे असतील या विषयी माहिती दिली. 3) प्लॉटिंगवरील जीएसटी ची लायबलिटी (GST Liability on plotting) प्रकाश देवलापूरकर माजी उपाध्यक्ष क्रिडार्इ कोल्हापूर यांनी प्रेझंटेशन देताना प्लॉट वरती जीएसटी कसा आकारला जातो याची महिती एकदम सहज सोप्या भाषेत दिली. 4) जॉइर्ंट प्रकल्पांमध्ये जोखीम व्यवस्थापन (Risk Management in JV Projects) या विषयावरती आदित्य बेडेकर यांनी 2 सभासद जेव्हा एखादा नविन प्रकल्प चालू करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी,अनुभव,त्या प्रकल्पा मधील चढ उतार काय येतात त्या वरती कशी मात करून आपण तो प्रकल्प कसा पुर्ण करावा या विषयी उदाहरणासह अत्यंत महत्तवाची माहिती दिली. 5) डिजीटल इंडिया E-7/12 आणि चावडी कसे वाचावे आणि कसे वापरावे (Digital India - How to read & use & E Chavadi) श्री शिवकुमार पाटील,सेवानिवृत्त मंडळ निरीक्षक आणी श्री कृष्णानाथ जाधव,ऑपरेटर डिजीटल इंडिया या ऍप मधुन सरकार आपणास घर बसल्या आपला ऑनलार्इन सात बारा पासून सर्व माहिती कशी मिळवता येते याची लार्इव्ह प्रझटेशनच्या माध्यमातुन याची इंत्यभूत माहिती दिली व सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलीत. 6) रियल इस्टेटमधील ब्रँडिंगचे फायदे(Branding benefits in Real Estate) ऋुषीकेश मगर यांनी आपल्या व्यवसायात वाढत चाललेली स्पर्धा व त्यामधुन दिसणारे आपले वेगळेपण कसे असावे.सध्याच्या डिजीटल युगात आपली कंपनी कशी वेगळी आहे तिचा आज पर्यंतचा प्रवास, सध्या चालू असलेले प्रोजेक्ट आणी भविष्यात करणाAया प्रोजेक्टची माहिती,विविध ऑफर, ग्राहक आकर्षित होतील यांची मांडणी कशी असावी या विषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली.क्रिडार्इ कोल्हापूरकडुन अध्यक्ष के.पी.खोत,उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदिप मिरजकर, क्रिडार्इ महाराष्टचे माजी अध्यक्ष राजीव परीख, क्रिडार्इ महाराष्ट्रचे सचिव विघानंद बेडेकर, क्रिडार्इ कोल्हापूरचे माजी उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर आदित्य बेडेकर, श्रीधर कुलकर्णी,प्रदिप भारमल,रविकिशोर माने,संग्राम दळवी,इतर सभासद उपस्थिीत होते.