रविवार ११ ऑगस्ट २०२४ रोजी राजाराम तलाव परिसर येथे एकाच वेळी एकाच ठिकाणी २ हजार झाडे लावण्याचा व कायम स्वरूपी निगा राखण्याचा ऋतुसंकल्प आमदार ऋतुराज पाटील यांनी केला होता. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना क्रि डा ई मार्फत आमदार ऋतुराज पाटील साहेब यांचा समवेत झाडे लावण्याच्या उपक्रमात भाग घेऊन या ठिकाणी २०० झाडे लावली
या प्रसंगी क्रि डा ई चे अध्यक्ष के पी खोत, उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदीप मिरजकर, खजानीस अजय डोईजड, माजी अध्यक्ष राजीव पारेख, सहसचिव गणेश सावंत, संचालक लक्ष्मीकांत चौगुले, विश्वजित जाधव, अमोल देशपांडे उपस्थित होते